Ad will apear here
Next
रामनाथ कोविंद यांच्या निवडीबद्दल भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे आनंदोत्सव
रामनाथ कोविंदमुंबई : रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने लाडूवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झाला.

या वेळी मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभार मानण्यात आले. ‘एका सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रपती बनविण्याची किमया केवळ भाजपमध्येच होऊ शकते,’ असे विधान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री रमेशचंद्र रत्न यांनी याप्रसंगी केले. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांनी राज्यातील अनुसूचित समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

या वेळी माजी खासदार भाऊसाहेब वाघमारे, राष्ट्रीय चिटणीस विजय गोवळकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक खरटमल, मुंबई अध्यक्ष शरद कांबळे, मोर्चाचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरचिटणीस सुखदेव अडागळे यांनी प्रास्ताविक केले. अशोक कानडे यांनी सूत्रसंचालन केले, तर चंद्रकांत हिवराळे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYLBF
Similar Posts
भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक उत्साहात मुंबई : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयात झाली. प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे केंद्रीय महासचिव रमेशचंद्र रत्न यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉ
‘शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध’ मुंबई : ‘महर्षी वाल्मिकींनी दिलेल्या शिकवणीनुसार शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
निवासी शाळा योजनेबद्दल ‘भाजप’ सरकारचे आभार मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना साह्य करण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच शाहू-फुले- आंबेडकर अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी निवासी शाळा ही नवीन योजना लागू केली आहे. याबद्दल महाराष्ट्रातील शेकडो संस्थाचालकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारचे आभार मानले आहेत
‘भारताच्या अफाट प्रतिभेचा सेवा क्षेत्रांना नैसर्गिक लाभ’ मुंबई : ‘सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आणि विस्तारणारा घटक आहे. रोजगार, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि नवसंशोधन याबाबतीत सेवा क्षेत्राचे आज वर्चस्व आहे. या उपक्रमामुळे भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक सेवा क्षेत्राबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ होतील,’ असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language